Sachin Pilot
Sachin Pilot|Rajasthan political crisis
राजकीय

सचिन पायलट यांची घरवापसी

राजस्थानातील सत्तासंघर्षावर अखेर पडदा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

जयपूर | jaipur -

राजस्थानातील सत्ता संघर्षावर ( Rajasthan political crisis ) अखेर पडदा पडला असून राजस्थान सरकारमध्ये भूकंप घडवत त्यांना धक्का देऊन बंडाचा झेंडा उभा करणारे Sachin Pilot यांची घरवापसी झाली आहे. ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत. Indian National Congress पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष आणि सरकारला साथ देणार असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षातर्फे सचिन पायलट यांचं बंड शमल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

आजच सचिन पायलट यांनी काँग्रेस खासदार Rahul Gandhi आणि काँग्रेसच्या महासचिव Priyanka Gandhi यांची भेट घेतली होती.

राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता होती. त्या अपेक्षेप्रमाणेच सचिन पायलट यांनी पक्षासाठी काम करण्याचं मान्य केलंय.

राजस्थानात सचिन पायलट हे राजकीय भूकंप घडवतील असं वाटत होतं. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. महिनाभराहून अधिक काळ सचिन पायलट यांनी राजस्थानमधलं राजकीय वातावरण अस्थिर ठेवलं. मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसचं ठंडा करके खाओफ हे धोरण कामी आलं आहे. त्यामुळेच बंडाचं झेंडा उगारत पक्षाला राम राम करणार्‍या सचिन पायलट यांची घरवापसी झाली आहे. गेल्या महिनाभरापासून अधिक काळ हरयाणात डेरा टाकून बसलेले आमदार आता जयपूरला परतण्याच्या तयारीत आहेत.

Ashok Gehlot यांना मुख्यमंत्री केल्याने आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री केलं गेल्याने सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी बंडाचा झेंडा उगारत गेहलोत सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मात्र काँग्रेसला राजस्थानचा गड राखण्यात यश आलंय कारण सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये परतले आहेत. आता घरवापसीनंतर राजस्थान काँग्रेसमध्ये त्यांना कोणतं स्थान दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोनियांची गेहलोतांशी फोनवर चर्चा

दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष Sonia Gandhi यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे राजस्थानातील राजकीय गुंता सोडवण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आल्याचे मानले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com