Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. सोमवारी सकाळी मनसेचे नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल केले. अंगात ताप होता यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप होता. दरम्यान, त्यांची लगेचच कोव्हिडची चाचणी करण्यात आली. मात्र ही चाचणी निगेटिव्ह आली. तसेच त्यांची मलेरियाचीही चाचणी यावेळी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंगात केवळ ताप आहे त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पुढील दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

अमित यांनी करोना काळात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अंगणवाडी सेविकांचा प्रश्नही त्यांनी शासनदरबारी मांडला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळानेही अपुर-या वेतनाबाबत त्यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल होते. आरे येथील मेट्रो कारशेडबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा अमित ठाकरे यांनी स्वागत केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या