राज ठाकरे यांचे परिवर्तन हा संशोधनाचा विषय - खा. संजय राऊत

राज ठाकरे यांचे परिवर्तन हा संशोधनाचा विषय -  खा. संजय राऊत

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

योगी कोण आणि भोगी कोण यासंदर्भात राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray) यांचे मतपरिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय असून राज यांनी वेळोवेळी बदललेल्या भुमिकांवरुन एखाद्याला पीएचडी करता येईल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut )यांनी शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath )यांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याची मोहिम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याविषयी बोलताना राऊत म्हणाले, योगी सरकारने फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करते.

भोंग्याच्या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करताना विरोधकांना अशांतता निर्माण करून लोकांची दिशाभूल करायची आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी भाजपवर लगावला. भोंग्याच्या प्रश्नाबद्दल राज्यातील सर्व पक्षांना सरकारने चर्चेला बोलावले होते. सर्वांनी मिळून निर्णय घेऊ असे ठरले होते. मात्र या बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Related Stories

No stories found.