महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'

योगींचं कौतुक करत राज ठाकरेंचा आघाडी सरकारला सणसणीत टोला
महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'

मुंबई | Mumbai

सध्या मशिदीवरील भोंगे (loudspeakers row) काढून टाकण्यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं (Yogi Sarkar) धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. मात्र योगींचं कौतुक करताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

"उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना" असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.