Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटक निकालावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, "आपलं कोणीही वाकडं..."

कर्नाटक निकालावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, “आपलं कोणीही वाकडं…”

मुंबई | Mumbai

देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (१३ मे) लागला. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

“आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असं मला वाटतं. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा” असं देखील राज यांनी म्हटलं आहे.

नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, दोघा झेडपी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. तर कर्नाटकात यापुढे जोमाने काम करु असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. कर्नाटकमध्ये आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर मेहनतीचे कौतुक आहे. आगामी काळात आम्ही कर्नाटकसाठी अधिक जोमाने काम करू असं ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कर्नाटकात द्वेषाची बाजारपेठ बंद झाली असून प्रेमाचे दुकान सुरू झाले आहे. आम्ही कोणत्याही द्वेष भावना, वाईट भाषा यांचा वापर न करता निवडणूक लढवली त्याबद्दल आनंद वाटतो. राज्याचे लोक, पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांचे मी आभार मानतो.

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी १३५ जागांवर काँग्रेस पक्ष विजयी ठरला असून काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर सत्ताधारी भाजपाला केवळ ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनता दल (सेक्युलर) पक्षालाही साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१८ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जेडीएसची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जेडीएसला केवळ १९ जागा जिंकता आल्या.

Accident : प्रवाशांसह बस पैनगंगा नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर १७ जण जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या