Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी

मुंबई | Mumbai

आज मराठी भाषा दिनादिवशीच (Marathi Bhasha Din) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) मोठी घोषणा केली आहे. मनसेनने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपूत्र असलेल्या अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मनसेने रविवारी पत्रक काढून याबाबतची घोषणा केली.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

दरम्यान राज ठाकरे यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेच्या (Shivsena) अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केली होती. राज ठाकरे यांनी सक्षमपणे या संघटनेचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळे राज ठाकरे ह अल्पावधीत लोकप्रिय झाले होते.

आता त्यांचे पूत्र अमित ठाकरे यांनाही हीच किमया साधता येणार का, हे पाहावे लागेल. तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.

तुम्हाला माहिती आहे का? ‘स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

दरम्यान अमित ठाकरे गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये (MNS) बऱ्यापैकी सक्रिय होते. मात्र त्यांच्याकडे पक्षाने कुठलेही पद किंवा जबाबदारी सोपवली नव्हती. ते मनसेच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच दौऱ्यावर जात असत. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अमित ठाकरेंवरील जबाबदारी वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या