…तर गालावर वळ उठतील, मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं

…तर गालावर वळ उठतील, मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं

मुंबई | Mumbai

मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला केवळ ती मराठी असल्यामुळेच घर नाकारण्यात आलं असून त्यावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. मनसेने जाब विचारताच सोसायटीने माफी मागितली असली तरी आता या मुद्द्याला राजकीय वलय प्राप्त झालं आहे. या मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

…तर गालावर वळ उठतील, मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं
Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू

राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट करत सरकारला इशारा दिला आहे. "मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

…तर गालावर वळ उठतील, मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं
माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण...

नेमकं काय घडलं?

मुलुंड वेस्टमधल्या शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा बघण्यासाठी तृप्ती देवरुखकर गेल्या होत्या. त्यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही जागा देत नाही असं सांगितले. त्यानंतर तृप्ती यांनी याबाबत दोघांकडे याबाबत जाब विचारला आणि सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सेक्रेटरीने तृप्ती यांच्या हातातून मोबाईल काढून घेतला. तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केला. स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचताच त्यांनी पिता पुत्रांना माफी मागायला लावली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com