“हा आजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो ...”; प्रबोधनकार ठाकरेंच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची पोस्ट

“हा आजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो ...”; प्रबोधनकार ठाकरेंच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची पोस्ट

मुंबई | Mumbai

आज दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे एक बहुरंगी व्यक्तिमत्व. संपादक, चळवळीकार, समाजसुधारक, वक्ते, नेते, छायाचित्रकार, टंकलेखक, पटकथा-संवाद लेखक अशी त्यांची ओळख होती. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त पोस्ट लिहिली आहे.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आज आमच्या आजोबांची- प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी कटाक्षाने आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की.. आजोबांच्या स्मृतीस अभिवादन."

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com