मुंबई | Mumbai

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवले असून या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या पत्रानंतर राज्यात राजकीय

भूकंप झाला आहे. या पत्राचे तीव्र पडसाद उमटत असून भाजपाकडून राज्यभरात देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं केल जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून थेट ठाकरे सरकारला घेरलं आहे.

राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशी फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील. असा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे. तर जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते. मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. त्यांच्या घराबाहेर बॉम्बची सापडते आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप होत आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. अशी मागणी देखील राज थाकात्रे यांनी केली आहे.

मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते. हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.