राज ठाकरेंचं 'जय श्रीराम!' शिवतीर्थावरील बैठक संपली... काय ठरलं बैठकीत?

राज ठाकरेंचं 'जय श्रीराम!' शिवतीर्थावरील बैठक संपली... काय ठरलं बैठकीत?
file photo

मुंबई | Mumbai

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) 'शिवतीर्थ' या निवास्थानी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी संबोधित केले.....

बाळा नांदगावकर म्हणाले की, दि. १ मे रोजी औरंगाबादला (Aurangabad) जाहीर सभा, ३ मे रोजी महाराष्ट्रात हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण, तसेच ५ जून रोजी अयोध्या यात्रा (Ayodhya Yatra) असे कार्यक्रम ठरलेले आहेत. त्यात कुठलाही बदल होणार नाही.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे (Loud Speaker) उतरविण्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्याआधी औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी काय तयारी करायची आहे. याबाबत बैठकीत माहिती देण्यात आले.

तसेच ५ जूनचा प्रवास कसा करायचा याबाबतदेखील सविस्तर चर्चा करण्यात आली. अयोध्या दौऱ्याबाबत केंद्रीय यंत्रणा आणि तेथील गृह मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

३ मे रोजी मनसैनिक राज्यात पोलिसांच्या (Police) परवानगीने विविध ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करतील, तसेच महाआरती करण्यात येईल. याबाबत नियोजन झाले असून प्रत्येकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

कायदा सुव्यवस्था आणि हनुमान चालिसा पठण याबाबत सरकारच्या निर्णयानंतर आमचे पुढचे नियोजन ठरेल. सरकारच्या नियमावली नंतरच आम्ही त्यावर विचार विनिमय करू, असेदेखील बाळा नांदगावकरांनी (Bala Nandgaonkar) स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.