हे तर स्क्रीप्टेड, ऋतुजा लटकेच विजयी होणार होत्या; राज ठाकरेंच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

हे तर स्क्रीप्टेड, ऋतुजा लटकेच विजयी होणार होत्या; राज ठाकरेंच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने रविवारी रात्रीपासून यावर मंथन करत अखेर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र स्क्रिप्टचाच भाग आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजार मतांनी ही निवडणूक जिंकणार होता. हे समजताच भाजपने त्यांचा उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाची चाहूल लागल्यानं उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघात भाजपने वैयक्तिक सर्व्हे केला. त्यात ऋतुजा लटके विजयी होणार याची माहिती भाजपला मिळाली होती असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. ईडीचे वकील अटर्नी जनरल अनिल सिंग यांचा युक्तिवाद झाला पूर्ण आहे. आजची सुनावणी आटोपली असून उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता संजय राऊत यांचे वकील युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळतो का हे पाहण्याचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com