सगळे प्रकल्प गुजरातला जात असतील तर...; मोदींचं नाव घेत राज ठाकरे स्पष्टच बोलले

राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई | Mumbai

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता नागपूर येथे होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

''महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला तर तो गुजरातमध्ये गेला. पण पहिल्यापासून माझं मत एकच आहे. पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत प्रत्येक राज्य हे त्यांच्यासमान मुलांसारखं असलं पाहिजे. उद्या समजा महाराष्ट्रातला हा प्रकल्प बाहेर गेला असता आणि समजा तो आसामला गेला असता तर मला वाईट वाटलं नसतं. प्रकल्प गुजरातला गेला म्हणजे तो शेवटी देशातच आहे ना,'' असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

''वाईट या गोष्टीचं वाटतं जो प्रकल्प महाराष्ट्रात येतोय आणि जो बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. म्हणूनच पंतप्रधानांनी स्वतः याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे. पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. आणि तो संपूर्ण देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योग धंदे आले पाहिजेत. तिथल्या लोकांना तिथून आपलं घर सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याची आणि तिकच्या लोकांना त्यांचं ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प समजा प्रत्येक राज्यात गेले, तर देशाचाच विकास होईल,'' असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com