
मुंबई । Mumbai
मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) यांचा ५ जून रोजीचा अयोध्या (ayodhya) दौरा....
तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Raj thackeray tweet) पुण्यात २२ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत आपण दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.