Saturday, April 27, 2024
Homeराजकीयजिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार

जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार

मुंबई

तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

करोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय ठप्प झालेले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिम चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बैठक घेतली. त्यावेळी किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला. जिम उघडण्यास ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिम चालक आणि मालकांनी केली आहे. जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्स यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांचंही म्हणणं आहे की, जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतो, जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होते. सगळीकडे सर्वच गोष्टी सुरु आहेत. मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगत सुरु करा, मात्र राज्य सुरु करायला तयार नाही. मागे केंद्राने विमानतळ सुरु करायला सांगितले होते मात्र राज्य तयार नव्हते. राज्याला वेगळी अक्कल आहे का ? असा सवाल त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या