ये एक सही कदम! मोदींच्या 'त्या' घोषणेनंतर राहुल गांधींचं ट्विट

ये एक सही कदम! मोदींच्या 'त्या' घोषणेनंतर राहुल गांधींचं ट्विट

दिल्ली | Delhi

देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron variant) वाढत जाणारे रुग्ण पाहता केंद्र सरकारने (central govt) सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस (booster dose) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले. पंतप्रधान मोदींच्या (pm modi) या निर्णयावर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

काँग्रेस (congress) नेते खासदार राहुल गांधी (rahul gandi) यांनी पंतप्रधान मोदींनी केलेली बूस्टर डोसची घोषणा योग्य पाऊल असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'केंद्र सरकारने बूस्टर डोसची माझी सूचना मान्य केली आहे. हे योग्य पाऊल आहे. लसी आणि बूस्टरची सुरक्षा देशातील लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल.'

तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदर केजरीवाल (arvind kejrival) यांनीही मोदींच्या या घोषणेचे कौतुक केले आणि या निर्णयामुळे आनंदी असल्याचे सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना अँटी-कोविड -१९ लसींचे बूस्टर डोस देण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आणि ते सर्वांना दिले जावे असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की आता १५-१८ वयोगटातील मुलांना देखील अँटी-कोविड -१९ लस दिली जाईल हे जाणून मला आनंद झाला.

काय म्हणाले पंतप्रधान?

३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोनाची लस दिली जाणार आहे. जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. त्यांच्याच प्रयत्नामुळे आज देशातील ९० टक्के जनतेला कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाशी लढताना देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, त्यामुळेच या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण मिळावं यासाठी १० जानेवारीपासून लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. जगभरात अनेक देश ओमिक्रॉनच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानंतर लसीचा आणखी बूस्टर डोस मिळणार असल्याचं मोदींनी सांगितलं. हा बूस्टर डोसही १० जानेवारीपासून मिळणार असल्याचं मोदी म्हणाले.

Related Stories

No stories found.