Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यादारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले...

दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa), मणिपूर (Manipur) आणि पंजाबमध्ये (Punjab) झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. ४ राज्यात भाजपने (BJP) आपली सत्ता राखली आहे….

- Advertisement -

तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सत्ता स्थापन करणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Visual Story : नवज्योत सिंग सिद्धूंचा पराभव करणाऱ्या ‘जीवनज्योत’ आहेत तरी कोण?

ते म्हणाले की, जनमताचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेचा कौल मिळवणाऱ्यांना शुभेच्छा आहेत. निवडणुकीसाठी झटलेल्या सर्व काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचा आभारी आहे. या निवडणुकीतून आपण धडा घेऊया आणि जनतेच्या हितासाठी अशाच प्रकारे काम करूया, असे आवाहन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे.

योगी आदित्यनाथ यांचा दमदार ‘कमबॅक’; रचणार नवा इतिहास

काँग्रेससाठी हा निकाल अनपेक्षित आहेत. जनतेचे आशीर्वाद मिळवण्यात अपयशी ठरल्याचे आम्ही मान्य करतो. पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी दिली.

विजय पचवायला शिकलं पाहिजे, अजीर्ण झालं की…; संजय राऊतांचा भाजपला टोला

- Advertisment -

ताज्या बातम्या