Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याRahul Gandhi : राहुल गांधी देणार शिक्षेला आव्हान; कोर्टात स्वत:उपस्थित राहण्याची शक्यता

Rahul Gandhi : राहुल गांधी देणार शिक्षेला आव्हान; कोर्टात स्वत:उपस्थित राहण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात सुरत न्यायालयात (surat court) अपील करणार आहेत.

- Advertisement -

अपील याचिका दाखल करण्यासाठी राहुल स्वतः सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. यासोबत नियमित जामिनासाठी राहुल गांधी न्यायालयात अर्जही दाखल करणार आहे.तसेच यावेळी कॉंग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन देखील करणार आहे.

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणूकांच्या रॅलीत केलेल्या वक्तव्याप्रकरणात भाजपच्या पूर्णेश मोदी यांनी बदनामीचा खटला दाखल केला होता. कर्नाटकच्या कोलार येथील रॅलीत २०१६ त्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी सगळ्या चोरांची आडनावे मोदीच कसे असा सवाल केला होता.

“नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते…”; कालीचरण महाराज पुन्हा बरळले

त्यामुळे मोदी आडनाव असलेल्या समाजाची बदनामी झाली असा दावा करणारा बदनामीचा खटला भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी दाखल केला होता. सुरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी २३ मार्च रोजी राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

लोकप्रियता मिळवण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींच थोतांड; विखे पाटलांनी सुनावले खडेबोल

त्याच वेळी राहुल यांना जामीन मंजूर करण्यात आला होता आणि शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.

दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास; क्रिकेटसोबतच Actor म्हणून प्रसिद्ध

- Advertisment -

ताज्या बातम्या