Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी राहुल गांधींनी सुचवले "हे" पर्याय

अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी राहुल गांधींनी सुचवले “हे” पर्याय

दिल्ली | Delhi

करोनामुळे संपूर्ण देशात अर्थव्यवस्था मंदीत सापडली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला सल्ला दिला आहे. शहरांमधील बेरोजगारांना मदत व्हावी या उद्देशाने मनरेगासारखी योजना संपूर्ण देशात राबविली जावी, असा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला ट्विट द्वारे दिला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, “शहरातील बेरोजगारीचे पीडित लोकांसाठी MGNREGA सारखी योजना आणि देशातील गरिबांसाठी NYAY योजना लागू करणे आवश्यक आहे. या योजना अर्थव्यवस्थेसाठी देखील फायद्याच्या ठरतील” तसेच “सूट-बूट-लूट चे सरकार गरिबांच्या वेदना समजून घेईल काय?” असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या