Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयराहुल गांधींनी माफी मागावी; मुंबई प्रेस क्लबची मागणी, 'हे' आहे कारण

राहुल गांधींनी माफी मागावी; मुंबई प्रेस क्लबची मागणी, ‘हे’ आहे कारण

मुंबई | Mumbai

लोकसभेचे (Lok Sabha) सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत राहुल गांधीं यांनी एका पत्रकाराला त्याच्या प्रश्न विचारण्यावरून लक्ष्य केले होते; तुम्ही थेट भाजपासाठी का काम करता? भाजपासाठीच काम करायचं असेल तर छातीवर भाजपाचा बिल्ला लावा. स्वत:ला पत्रकार असल्याचं भासवू नका, अशा शब्दात राहुल गांधी त्या पत्रकारावर बरसले होते.

- Advertisement -

याप्रकरणामुळे पत्रकार राहुल गांधींवर नाराज झाले आहेत, त्यावरून आता मुंबई प्रेस क्लबने (Mumbai Press Club) आक्रमक भूमिका घेत राहुल गांधीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शनिवारी काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) पत्रकाराचा सार्वजनिक अपमान केल्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रेस क्लबने केली आहे.

एक किलोमध्ये घर चालते का ?, राज्यात गोरगरिबांची चेष्टा चालली आहे ; अजित पवारांची सरकारवर टीका

क्लबने त्यासाठी स्वतंत्र पत्रक काढत निवेदन केले आहे. राहुल गांधी यांना अपात्रतेबद्दल विचारलं असता, राहुल गांधींचं स्वत:वरचं नियंत्रण हरवलं आणि त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला फटकारलं. “तुम्ही थेट भाजपासाठी का काम करत आहात? भाजपासाठी काम करायचं असेल तर छातीवर भाजपाचा बिल्ला लावा. पत्रकार असल्याचं भासवू नका… क्यूं हवा निकल गई?” अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली. यावर आता मुंबई प्रेस क्लबने आक्षेप घेत, राहुल गांधी यांच्याविषयी संताप व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

“पत्रकाराचं काम प्रश्न विचारणं आहे. संबंधित प्रश्नांना सन्मानाने आणि सभ्यतेने उत्तरे देणे, हे राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे. पण ही दुर्दैवाची बाब आहे की, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते राहुल गांधी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे राहुल गांधींनी आपली चूकभूल मान्य करून संबंधित पत्रकाराची माफी मागावी,” असं निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राजकारणातील सभ्य नेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडे बघितले जात होते, मात्र या प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहचला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या