मोदी देश उद्ध्वस्त करताहेत
राजकीय

मोदी देश उद्ध्वस्त करताहेत

राहुल गांधींची टीका

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

मोदी देशाला उद्ध्वस्त करताहेत, अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा सत्यानाश केला अशा शब्दांत कॉँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांनी टीका केली आहे.

करोना लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. करोनानंतर गुंतवणुकीसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिकार्‍यांनी करोनाच्या पाश्वभूमीवर सादरीकरण करताना लॉकडाऊनचा मोठा फटका रोजगार वाढीला बसला आहे. जवळपास 10 कोटी नोकर्‍या धोक्यात आल्याची माहिती दिली. यासंदर्भातील बातमी ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर Modi Government जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मोदी देशाला उद्ध्वस्त करायला निघालेत. पहिली नोटाबंदी, दुसरी जीएसटी, तिसरी करोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथी म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी एक भ्रम निर्माण केला आहे. हा भ्रम लवकरच तुटेल, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com