Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकाँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी?; ५ तासांनंतर काँग्रेसची बैठक संपली

काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी?; ५ तासांनंतर काँग्रेसची बैठक संपली

दिल्ली । Delhi

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली ही बैठक जवळपास पाच तास सुरू होती.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून खळबळ उडवून देणाऱ्या २३ नेत्यांसोबतच्या बैठकीत खासदार राहुल गांधी यांनी पक्ष देणार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची स्पष्ट केले आहे. त्यामुळे राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राहुल गांधी यांना अध्यक्ष करा अशी मागणी त्यांच्या गटाने केली. तर काँग्रेस अध्यक्ष निवडणूक घेऊन निवडावा अशी मागणी काही नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसमध्ये लेटर बॉम्बने खळबळ उडवून देणाऱ्या २३ नेत्यांशी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी चर्चा केली. या बैठकीत वर्किंग कमिटीची निवडणूक घेण्याची मागणी माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी केली. तर तर राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करावे, अशी मागणी राहुल गांधी गटाने केली. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू असं यावेळी राहुल गांधींनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या १० जनपथ येथे ही बैठक झाली. या बैठकीत गुलाम नबी आझाद, मनिष तिवारी, शशी थरूर आणि इतर नेत्यांचा समावेश होता. हे नेते पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये सहभागी होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक आयोजित करुन चर्चा करण्यावर महत्वाची भूमिका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी निभावली. काही दिवसांपूर्वी कमलनाथ यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

सूत्रांच्या मते, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या नेत्यांची नाराजी दूर होण्याची शक्यता वाढते. या बैठकीच्या एक दिवसआधी शुक्रवारी पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं, काँग्रेस पक्षाचे ९९.९९ टक्के नेत्यांना आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की, राहुल गांधींनी पुन्हा एकदा पक्षाचे नेत्रृत्व करावे. गेल्या ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला मजबूत केंद्रीय नेत्रृत्व आणि पक्षाला एक पूर्णवेळ अध्यक्ष हवा असल्याचं म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या