Friday, April 26, 2024
Homeराजकीयराहुल गांधी यांनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले...

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

दिल्ली l Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सातत्याने टीका करतात. दरम्यान राहुल गांधी यांनी देशातील इंधन आणि सिलेंडरच्या वाढलेल्या किमती तसेच नवे कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘शेतकरी करत असलेलं आंदोलन देशहिताचं आहे. हे तीन कृषी कायदे फक्त शेतकरी आणि कामगार यांच्यासाठीच घातक नसून संपुर्ण देशासाठी ते घातक आहे.’ असे ट्विट राहुल यांनी केले आहे.

तसेच, ‘मोदी सरकारने देश आणि घराचं बजेट बिघडून टाकले. बजेटनंतर माहगाईत मोठ्य़ा प्रमाणात वाढ करण्यात आली. २०२१ च्या अर्थसंकल्पामुळे पेट्रोल-डिझेल आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली.’ असे म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३० पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. या वाढीनंतर राज्यात पेट्रोलची किंमत राज्यात विविध ठिकाणी ९४ रुपयांच्या पुढे गेली आहे तर डिझेलची किंमत ८४ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच LPG सिलेंडरच्या किंमतीही गुरुवारी वाढल्या. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही प्रति सिलिंडरमध्ये २५ रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे घराचं बजेटही बिघडलं आहे.

तसेच, शेतकऱ्यांचे गेल्या ७२ दिवसांपासून दिल्लीतील विविध सीमांवर आंदोलन सुरु असून, आज शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या