Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याडरो मत! राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक, मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

डरो मत! राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक, मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

दिल्ली | Delhi

सुमारे चार वर्षांपूर्वी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली. यानंतर देशभरातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडल आणि पक्षाच्या नेत्यांनी आपले डीपी बदलले आहेत. यामध्ये राहुल गांधींचा फोटो दिसत असून त्यावर ‘डरो मत!’ असा मजकूर लिहला आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलचा डीपी बदलून त्याचे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे.

रस्त्यात बंद पडलेल्या गाडीला खा. विखेंचा ‘दे धक्का’; सोशल मीडियावर होतंय कौतुक

तसेच काँग्रेसनं मोठ्या आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेसनं रस्त्यावर उतरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची इतर पक्षांसोबत भेट घेण्याचा निर्णय घेतलाय. मुख्य विरोधी पक्षानं न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच जनआंदोलनाची घोषणा केली.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गुरुवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली. बैठकीत सुमारे तासभर चर्चेनंतर शुक्रवारी विजय चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

RRR च्या ‘नाटू नाटू’ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. राहुल यांना तुरूंगवासाची शिक्षा म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत हक्क, लोकशाही अभिव्यक्ती आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. वारंवार देशातील राजकीय पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक केले.

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले

तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ट्विट करुन आपले मत मांडले. ज्या न्यायालायने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली ते न्यायालय गुजरातमध्ये आहे. त्यामुळे मला काहीही बोलायचे नाही. राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर विरोधी पक्ष घाबरतील, मैदान सोडून पळ काढतील, असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. आम्ही संघर्ष करु, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुण्यात ओशो आश्रमात राडा! अनुयायांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या