
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बदनामी प्रकरणात शिक्षा झाल्याने त्यांना आपल्या खासदारकीसह सरकारी निवासस्थानदेखील गमवावे लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली.
यामुळे राहुल गांधी यांना आपली खासदारकी काल पुन्हा बहाल करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना सरकारी निवासस्थानदेखील परत देण्यात आले आहे. त्यामुळे '12 तुघलक लेन' याच ठिकाणी राहुल गांधी पुन्हा वास्तव्यास येणार आहेत.
सरकारी निवासस्थान परत मिळाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'संपूर्ण भारतच माझं घर आहे,' असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.