खतम…टाटा…गुडबाय! राहुल गांधींच्या 'त्या' VIDEO ची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

खतम…टाटा…गुडबाय! राहुल गांधींच्या 'त्या' VIDEO ची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

दिल्ली | Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भार जोडो यात्रा' अंतिम टप्प्यात आली आहे. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून, यात्रा आता जम्मू काश्मीरात दाखल झाली आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान राहुल गांधींचा आगळा-वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे.

याच दरम्यान सोशल मिडीयावर राहुल गांधींच्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. एका खासगी यूट्यूब चॅनेलने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यान राजस्थानमध्ये एक छोटशी मुलाखात घेतली आहे. या मुलाखतीत राहुल गांधी यांना त्यांच्या आवडी निवडी, पर्यटन आणि खान पानाबाबत प्रश्न विचारले. तर या मुलाखती दरम्यान राहुल यांनी एकाचं दमात एकट्याने तब्बल चार आईस्क्रीम कप संपवले. त्यानंतर खतम, टाटा, गुडबाय अशी एक रिल चॅनलवर शेअर केले आहे. सोशल मिडीयावर सध्या या रिलची जोरदार चर्चा सुरु आहे.

तसेच या मुलाखतीत राहुल गांधींनी आपल्या विवाहाविषयी सांगितले. जर मला एखादी बुद्धिमान मुलगी मिळाली, तर मी लग्न करेन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी लग्न करण्यास तयार आहे असे सांगत त्यांनी मुलीच्या बुद्धिमत्तेवर विशेष जोर दिला. माझ्या आई-वडिलांचे लग्न उत्तमरित्या झाले. म्हणूनच माझेही विवाहासंबंधीचे विचार अतिशय उच्च दर्जाचे आहेत. मलाही अशीच जीवनसाथी हवी असे राहुल गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मी आपल्या देशाची संस्कृती आणि खानपानाबाबतच्या गोष्टी अतिशय जवळून पाहिल्या आणि त्यांचा अनुभव घेतला असेही ते म्हणाले. तेलंगणसारख्या काही राज्यांमध्ये मसालेदार पदार्थांचा उपयोग अधिक केला जातो. संस्कृती केवळ राज्यांच्या सीमेनंतरच बदलते असे नाही, तर ती राज्यांच्या आत देखील बदलत असते, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.

आपल्याला तंदुरी खूप आवडते असेही त्यांनी सांगितले. म्हणून चिकन टिक्का, सीख कबाब आणि चांगले ऑमलेट त्यांना खूपच आवडते असे ते म्हणाले. मात्र आपण कंट्रोल्ड डाएट घेतो आणि मिठाई मात्र चार हात दूर ठेवतो हे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यांना फणस आणि मटर बिलकुल आवडत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com