Friday, April 26, 2024
Homeराजकीयराहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की

राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की

लखनऊ

हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखले. यानंतर ते चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडले असा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशात फक्त मोदीच फिरु शकतात का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, मला एकट्याला हाथरसला जाऊ द्या असा मी पोलिसांकडे आग्रह धरला. मात्र पोलिसांनी आपला हा आग्रह मान्य केला नाही. एकट्या व्यक्तीवर कलम १४४ लागू होत नाही असे आपण म्हटले. मात्र पोलिस ऐकायला तयार नव्हते. मी हाथरसला जात असताना पोलिसांनी मला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर माझ्यावर लाठ्या चालवल्या आणि मला जमीनीवर पाडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या