Thursday, April 25, 2024
Homeराजकीय“मोदीजी तो गुलाबी चष्मा काढा, ज्यामधून...”; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

“मोदीजी तो गुलाबी चष्मा काढा, ज्यामधून…”; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

दिल्ली | Delhi

भारतात दररोज लाखो करोना रुग्णांची वाढ होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशभरातील रुग्णालयात बेड कमी पडू लागले, ऑक्सिजनचा तुटवडा झाला आणि मृतदेह जाळण्यासाठी स्मशानात जागाही अपुरी पडायला लागली आहे.

- Advertisement -

त्यातच बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेवरून कॉंग्रेल नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हंटल आहे की, “देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही.”

‘देशाला PM आवास नाही, श्वास पाहिजे’; राहुल गांधींची सडकून टीका

तसेच राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील टीका केली आहे. ‘ज्यांनी राम राज्यांची स्वप्ने दाखविली त्यांनीच राम भरोसे सोडले’, असे रिट्विट करीत भाजप सरकारवर टीका केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरवातीला आरजेडीतील प्रमुख असलेले लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र प्रताप यादव यांनी ट्विट करीत बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रवक्ते मलिक यांनी यादव त्यांच्या ट्विटला रिट्विट करून भाजपवर निशाणा साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या