चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
राजकीय

चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवत खोटेपणाचा आरोप केला आहे

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

सर्वांना भारतीय सैन्याच्या Indian Army क्षमतेवर आणि शौर्यावर विश्वास आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना PM Narendra Modi नाही, अशी जहरी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी चीनच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. तसेच त्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवत खोटेपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत टीका केली आहे

राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यावर विश्वास आहे. मात्र, ज्यांच्या भ्याडपणामुळे चीनने आपल्या जमिनीवर ताबा घेतला, ज्यांच्या खोटेपणामुळे ही जमीन आता चीनकडेच राहील अशा पंतप्रधानांना भारतीय सैन्यावर विश्वास नाही.”

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com