Dis'Qualified MP... खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईल बदललं

Dis'Qualified MP... खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईल बदललं

दिल्ली | Delhi

सूरतमधील एका न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आणि दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आपले लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले आहे. यानंतर लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप करत काँग्रेसकडून संपूर्ण देशभरात आंदोलन केले जात आहे.

दरम्यान खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये (Twitter Bio) मोठा बदल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटर (Twitter) प्रोफाईलवर अपात्र खासदार असा उल्लेख केला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी बदल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये आता 'Dis’Qualified MP' असे पाहायला मिळत आहे.

Dis'Qualified MP... खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईल बदललं
महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!

राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ पक्षाकडून आज एक दिवसीय 'संकल्प सत्याग्रह' केला जात आहे. पक्षाचे कार्यकर्ता संपूर्ण देशभरात आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. दिल्लीतील राजघाट येथे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही सत्याग्रह आंदोलन केलं जात आहे. याशिवाय देशभरात काँग्रेसच्या सर्व जिल्हा मुख्यालयांच्या बाहेर एकदिवसीय सत्याग्रह केला जात आहे.

Dis'Qualified MP... खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईल बदललं
शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल

नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकमधील एका सभेला संबोधित करताना मोदी आडनावावरुन एक टिप्पणी केली होती. सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं? अशी विचारणा राहुल गंधी यांनी केली होती. राहुल गांधींच्या या विधानाविरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सूरत कोर्टात झालेल्या सुनावणीत राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Dis'Qualified MP... खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईल बदललं
ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार होती. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी केरळच्या वायनाड येथून लोकसभा खासदार होते. लोकसभेच्या वेबसाईटवरुनही राहुल गांधी यांचं नाव हटवण्यात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com