Friday, April 26, 2024
Homeराजकीय'देशाला PM आवास नाही, श्वास पाहिजे'; राहुल गांधींची सडकून टीका

‘देशाला PM आवास नाही, श्वास पाहिजे’; राहुल गांधींची सडकून टीका

दिल्ली l Delhi

देशात करोनाचा हाहाकार माजला आहे. एकीकडे करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे.

- Advertisement -

देशात एकीकडे ही परिस्थिती सुरु आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसकडून चांगलाच हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला करोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.

करोनामुळे हे काम रोखण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. करोना स्थितीत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे. दरम्यान शनिवारी राहुल गांधी यांनी ‘जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए’ असं ट्वीट केलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या