‘यामुळे’ महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानेच पडेल

राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा
‘यामुळे’ महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानेच  पडेल
आ. राधाकृष्ण विखे पाटील

पुणे (प्रतिनिधि) / Pune - राज्य सरकारमधील मंत्र्यांची निष्क्रियता आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे आपल्या ओझ्यानेच पडणार आहे, त्याला दुसर कोणी पाडण्याची आवश्यकता नाही असे भाकीत भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुणे विद्यार्थी गृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सारथी संस्था अशा विविध विषयांबाबत त्यांनी भाष्य केले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
मराठा आरक्षण : केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळली

पुनर्विचार याचिका दाखल करणार

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही. हे सरकार काही करेल असं वाटत नाही. त्यामुळे आता मीच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्याची तयारीही सुरू केली आहे, असं त्यांना सांगितलं. सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षणाचंही तेच झालं. त्यामुळे सरकार विरोधात वातावरण आहे. सरकारला हेच करायचं होतं का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

राज्यात मराठा किंवा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलना बाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.समाजासाठी होत असलेल्या या आंदोलनाना आणि मागण्यांना पाठींबा असून सरकार याबाबत काय करणार समजायला तयार नाही. कोणीतरी तिसराच माणूस पुढे येवून याबाबत जनतेला माहीती देतो पण सरकार याबबात धाडसाने सांगण्यास पुढे येत नाही याचे आश्चर्य वाटते.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होते. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. मात्र, ते न करता सर्व काही केंद्र सरकारवर ढकलंत आहे. काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाली आहे. त्यामुळेच मी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
शिवसेना-राष्ट्रवादीची गुप्त बैठक

सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेशी पूर्ण सहमत

कॉँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी इंदापूर येथील एका कार्यक्रमात, 1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती. तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, दुर्दैवाने कोंग्रेस पक्षातील विचार मंथनाची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. कोंग्रेस पक्षात मी अनेक वर्षे काम केले आहे. मंत्री महणून, राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून साडेचार वर्षे काम केले आहे. त्यामुळे कदाचित मी विविध पदे, मंत्रीपदे भोगली म्हणून मी बोलतो त्यामुळे माझ्यावर टीकाही होईल. परंतु, आम्ही सुद्धा पक्षाकरता झिजलो आहे. पक्षाच्या सक्षमीकरता काही भूमिका मांडली तर ती पक्षविरोधी भूमिका म्हणून समजली गेली. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण नाही. त्यामुळे मूठभर लोक सत्तेत आहेत. जे मंत्री झाले, त्यातील काही मंत्रीही नाराज आहेत. ज्यांना मलईदार असलेले खाते मिळाले तेच मंत्री फक्त खुश आहेत. त्यांचे मंत्रिपद काढून घेतले तर ते पक्षाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतील. त्यामुळे शिंदे साहेबांनी जी भावना व्यक्त केले त्याला आपण पूर्णपणे सहमत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा द्यावा

सरकारमध्ये आरक्षणापेक्षा सारथीची चर्चा जास्त होताना दिसते.मुळातच सारथीसाठी सरकारकडे भीक मागणे हे आम्हाला मान्य नाही. ज्या हेतुसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली त्याबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळे ‘सारथी’ मधील राजकीय हस्तक्षेप थांबवायचा असेल तर ‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यांना अशी सूचना त्यांनी केली.

अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिल्यानंतर आरक्षण नसल्याने शंभर टक्के मराठा समाजाच्या मुलांना अनेक संधी मिळतील. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करता येतील, चांगल्या शिक्षण संस्थांबरोबर विद्यार्थ्यांना जोडून देता येईल. ज्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये काम करायचे त्यांना ते करता येईल. शिष्यवृत्ती हा एक भाग झाला, तो विद्यापीठामार्फत मिळेलच असे सांगून विखे पाटील म्हणाले, मराठा समाजातील अनेक मान्यवर आहेत जे विविध क्षेत्रात उत्तम काम करतात. त्यांना अभिमत विद्यापीठाची जाबाबदरी दिली तर :प्रोफेशनली’ विद्यापीठ चालेल. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप थांबेल आणि मराठा समाजाच्या मुलांचे भविष्य उज्वल होईल असे ते म्हणाले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
मोदींच्या मंत्रिमंडळात फडणवीसांना स्थान?
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com