पुण्यात मनसेला धक्का! डॅशिंग नेत्याचा राजीनामा

'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
पुण्यात मनसेला धक्का! डॅशिंग नेत्याचा राजीनामा

पुणे l Pune

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्याआधीच मनसेला जबर धक्का बसला आहे.

मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thombare Resigned ) यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देते. यापुढेही आपले आशीर्वाद व राज ठाकरे हे नाव ह्रदयात कायम कोरलेले राहिल, असे राजीनामा पत्रात रुपाली पाटील ठोंबरे यांनी नमूद केले आहे.

रुपाली ठोंबरे पाटील या लवकरच कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत, याबाबतची भूमिका त्या लवकरच स्पष्ट करणार आहेत. दरम्यान त्यांनी याबाबतची माहिती दिली नसली, तरी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कोण आहे रुपाली पाटील ठोंबरे?

पुण्यातील मनसेच्या अत्यंत आक्रमक नेत्या अशी रुपाली पाटील ठोंबरे यांची ओळख होती. मनसेचं पुण्यातील सर्वात चर्चेत असणारं नाव रुपाली पाटील-ठोंबरे यांचं होतं. महाराष्ट्रभर सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोविंग देखील प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनामा देण्याने पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे.

दरम्यान रुपाली पाटील ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’,” असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com