अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी महिलेवर गुन्हा

शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची तक्रार
अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी महिलेवर गुन्हा

पुणे (प्रतिनिधि) - उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या एका महिलेच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी फेसबुकवर अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य करणारी पोस्ट टाकली होती. ही पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली होती.

यानंतर शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार या महिला विरोधात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com