पुणे पदवीधरच्या निवडणुकीतून 'या' खासदाराच्या पुत्राची माघार
राजकीय

पुणे पदवीधरच्या निवडणुकीतून 'या' खासदाराच्या पुत्राची माघार

पार्थ पवारांसाठी माघार घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Arvind Arkhade

पुणे।प्रतिनिधी।Pune

पुणे पदवीधर निवडणूक सध्या उमेदवार जाहीर होण्याआधीच गाजते आहे. विशेषत: राष्ट्रवादीच्या गोटात उमेदवारीबाबत ज्या घडामोडी घडता आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात या निवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे.

आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाची आपण निवडणूक आपण लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रमुख आणि सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अगोदर जोरदार तयारी केलेल्या सारंग पाटील यांनी अचानक माघारीचा निर्णय का घेतला अशी चर्चा सुरु असतानाच पाटील यांनी पार्थ पवारांसाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने मात्र, हे वृत्त फेटाळले आहे.

मगरी बद्दल बोलताना पाटील म्हानले, मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून या निवडणुकीत उमेदवारी करायची या जिद्दीने मी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. निवडणुकीची तयारी म्हणून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीही मी केली.

यावेळी थेट आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटी स्तरापर्यंत माझा संपर्क आलेला आहे. कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. मात्र, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनवधानाने सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. यात श्रीनिवास पाटील विजयी झाले, त्यानंतर मी हा निर्णय बदलला.

पोटनिवडणुकीत पक्षाने श्रीनिवास पाटील यांना निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. ही निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील अनेक कामात माझा थेट संपर्क येऊ लागला आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार पाटील यांचे काम पुढे घेऊन जाणे, मतदारसंघातील कामे होणे गरजेचे आहे.

जर मी पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत लक्ष घातलं तर सातारा मतदारसंघातील कामे मागे पडतील. यासाठी मी पदवीधर मतदारसंघातील निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण सारंग पाटील यांनी दिले.

माझा निर्णय निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मी कळवला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही माझा निर्णय कळविला आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी मी यासाठी जबाबदारीने काम करणार असल्याचे सारंग पाटील म्हणाले.

पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झालेल्या पार्थ पवारांसाठी पाटील यांनी मागहार घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अत्यंत दारूण पराभव झाल्यानंतर पार्थ पवार गेल्या काही महिन्यात राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी कालच केली होती. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून करोना परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली. मावळ तालुक्यातही त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

मावळ लोकसभा निवडणूक लढविण्यापूर्वी ज्यावेळी नावे चर्चेत होती त्यावेळी खुद्द शरद पवार यांनी पार्थ पवार उमेदवार नाही असे ठासून सांगितले होते. पवार कुटुंबात मोठे राजकारण रंगले आणि अखेर पार्थ पवार हेच उमेदवार झाले. स्वतः शरद पवार यांनाच पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडावा लागला. पहिल्याच भाषणात पार्थ पवार यांची परिक्षा झाली आणि त्यातूनच पराभवाचे बीज रुजले.

राष्ट्रवादीतील या दुफळीचा शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना फायदा मिळाला. त्यानंतर पार्थ पवार हे गेले वर्षभर पडद्या आड होते. पदवीधर मतदारसंघातून त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. केवळ त्यांच्यासाठीच संभाव्य उमेदवार सारंग पाटील यांनी सर्व तयारी केली असताना त्यांनी आपण निवडणूक ल लढिविणार नसल्याचे जाहीर केले. या निर्णयाचा पाटील यांच्या समर्थकांनाही धक्का बसला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com