अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता? मिळणार मोठी जबाबदारी

अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता? मिळणार मोठी जबाबदारी

पुणे | Pune

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची (Parth Pawar) वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कालच अजित पवारांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा ३२ वर्षांनी राजीनामा दिला . त्यानंतर अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे. या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार हे गेल्या ३२ वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण त्यांनी आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com