Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय'

‘महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय’

पुणे(प्रतिनिधि)

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल महाविकास आघाडील पक्षांनी एकत्रित काम सुरू केल्याचा आणि महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. नागपूरच्या जागेवर गेली अनेक वर्षे आम्हाला कधीच यश मिळालं नव्हतं, गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा अनेक वर्षे होती तरी सुद्धा काँग्रेसला यश मिळते हे महाविकास आघाडीचे यश आहे आणि यापूर्वीच्या लोकांना ज्यांना आज पर्यत जनतेन स्वीकारलं होत त्यापेक्षा वेगळा निर्णय लोकांनी यावेळी घेतला त्याचा हा परिणाम आहे,असे पवार म्हणाले.

दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल पाहता महाराष्ट्राचे चित्र बदलते आहे या बदलला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठींबा आहे या सर्व विजयी उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो असे पवार म्हणाले.

एकटे एकटे लढले असते तर चित्र वेगळं असते अस विधान या निकालावर चंद्रकांत पाटील यांनी केले होती त्यावर बोलताना शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले, विनोदी विधान करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा लौकिक आहे, ते मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहीत आहे , तेव्हा आमचे एका पेक्षा ज्यास्त उमेदवार होते त्यामुळे ते निवडून आले त्याचा अंदाज त्यांना होता त्यामुळे विधानसभेच्या वेळी त्यांनी पुण्यातला त्यांच्या सोयीचा मतदारसंघ निवडला त्यांना जर विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता त्यामुळे त्यांनी एखादे स्टेटमेंट केले असेल तर त्याकडे गांभीर्याने पहायची गरज नाही, असे पवार म्हणाले दरम्यान धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत अमरीश पटेल यांचा झालेला विजय हा खरा विजय नाही ते यापूर्वी त्या जागेवर विजय झाले होते त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या पाठीशी राहिला म्हणून त्यांचा विजय झाला असे पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या