पुदुच्चेरीत काँग्रेसला मोठा धक्का; सरकार कोसळलं

पुदुच्चेरीत काँग्रेसला मोठा धक्का; सरकार कोसळलं

दिल्ली l Delhi

केंद्र शासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस - डीएमके आघाडीच्या व्ही नारायणसामी सरकार कोसळलं आहे.

पुदुच्चेरीत रविवारी सरकारमधील दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणस्वामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.

दरम्यान, नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवण्यात आल्यानंतर सौंदरराजन यांनी पदभार स्वीकारलाय.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com