Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयकार शेडचा निर्णय घेताना जनतेचे हितच बघितले

कार शेडचा निर्णय घेताना जनतेचे हितच बघितले

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

मेट्रो 3 चे कारशेड आरेतील 33 हेक्टर जागेवर बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतून मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी जनतेचे हित पाहिले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ना.गुलाबराव पाटील सोमवारी जळगावात आले असता अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तसे आमचेही म्हणणे होते की बुलेट ट्रेन हा विषयच चुकीचा आहे.

मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. मात्र, बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबादच का झाली? आरेच्या बाबतीत म्हणायचे झाले तर, पैशांच्या किंमतीपेक्षा तेथील नैसर्गिक वातावरण टिकवणे महत्त्वाचे आहे.

आरेतील जागा सोडली तर आज मुंबईतील लोकांसाठी कोणतेही नैसर्गिक जंगल उपलब्ध नाही. त्यामुळे आरे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेचे हित पाहिले आहे, असे ना.पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विषयावरही ना.गुलाबराव पाटील यांनी आपले मत मांडले. नवीन कृषी कायद्यात काही मुद्दे चांगले आहेत तर काही चुकीचे आहेत. या विषयावर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. जे मुद्दे चांगले आहेत, त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या