जळगाव : राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध
राजकीय

जळगाव : राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळ्याप्रसंगी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्यावरून राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. याचा जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात अल्पसंख्याक आघाडी प्रदेशअध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सचिव अॅड.कुणाल पवार, डॉ.रिजवान खाटीक, किरण वाघ, किशोर सुर्यवंशी, कुणाल मोरे, कैसर काकर, ममता तडवी, अखिल पटेल, अमोल कोल्हे, गणेश निबांळकर, गौरव वाणी, अक्षय वंजारी, नितीन जाधव, कल्पेश पाटील, हर्षवर्धन खैरनार, अनिल पवार, फिरोज शेख तसेच रहीम तडवी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com