केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर जीवघेण्यापर्यंतचे अत्याचार सुरु आहेत - विश्वजित कदम

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर जीवघेण्यापर्यंतचे अत्याचार सुरु आहेत - विश्वजित कदम

पुण्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

पुणे |प्रतिनिधी| Pune

"एका बाजूने महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन चांगले काम करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर जीवघेण्यापर्यंतचे अत्याचार सुरु आहेत. आता नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. दसऱ्याला रावण दहन केले जाते. श्रीरामाचा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य सुरु आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारवर केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने उत्तर प्रदेश येथील लखीमपुरच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला पुणे शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

लखीमपुरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यापारी वर्ग, भाजी मार्केट यांनी आंदोलनाला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी रॅली, मोर्चा काढून बंद ठेवण्याचे आवाहन केले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने बंदच्या निमित्ताने आक्रोश सभेचे आयोजन केले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

कदम म्हणाले, "शेतकरी आपला अन्नदाता आहे. आपले पूर्वज कशी ना कधी शेतकरी होते. याआधी सुद्धा भाजपने शेतकरी आंदोलनात अन्नदात्यावर गोळीबार करून शेतकऱ्यांची हत्या केली होती. आता हि लखीमपूरची घटना घडली आहे. देशात जातीवाद वाढत चालला होता. त्याला रोखण्यासाठी महाविकास सरकारने शेतकऱ्यांचे १९ हजार कोटींचे कर्जमाफ केले. याच काळात नकळत फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामध्ये हे भाजप सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे. अत्याचारी रावणाचे दहन करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे.'

मार्केटयार्ड, व्यापारी महासंघ यांचा बंदला पूर्णतः पाठिंबा

उत्तर प्रदेश येथील लखीमपुरची घटना दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांविरोधातील ही घटना अत्यंत खेदजनक आहे. पुणे व्यापारी महासंघ पूर्णत: या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे. महाविकास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघ सहभागी होणार असल्याचे कालच व्यापाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी पाळला.

पुणे शहारत मध्यवर्ती भागात असणारी दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र रस्त्यावर गर्दी होती. तर उपनगरात पौड फाटा, कर्वे रोड येथील सर्व दुकाने बंद होती. बाणेर - बालेवाडी - पाषाण, सुतारवाडी मध्ये बंदला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. काही उपनगरांमध्ये संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

Related Stories

No stories found.