विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा चाळीसगावातून निषेध

jalgaon-digital
2 Min Read

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परीक्षा होत नसतील तर परीक्षा शुल्क परत करा, चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात कपात करा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विविध विद्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात भेट नाकारली म्हणून शिवसेनेचे मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली असता विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशावरून काल अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा चाळीसगाव येथे आज…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या संबंधीचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना पार्श्वभूमीवर चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, ज्या परीक्षा झाल्याच नाहीत त्यांची परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना तात्काळ परत करा, २०१९-२० च्या द्वितीय सत्राची परीक्षेच्या निकालाचे पुनर्रमूल्यांकन व्हावे, धुळे येथे विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, धुळे येथील घटनेच्या वेळेस अमानुष पणे विद्यार्थ्यांना पोलीस दलातील व्हिडीओ मध्ये दिसत असणारा हिरवा शर्ट परिधान केलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यास तात्काळ निलंबित करावे. अश्या स्वरूपाच्या मागण्या युवा मोर्चाने निवेदनाच्या माध्यमातून मागितल्या आहेत. सदर मागण्यांची सरकारने ७ दिवसाच्या आत दखल घ्यावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष भावेश कोठावदे यांनी यावेळी दिला.

तसेच द्वितीय सत्राच्या परीक्षेच्या निकालाचे चुकीचे मूल्यांकन केले म्हणून प्रा.सचिन दायमा यांनी Aपॉलिटिक्सची घेत असलेल्या शिक्षणाची पदवी सरकारला परत करत यापुढे शिक्षण घेणार नाही असे सांगत सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहर सरचिटणीस सौरभ पाटील, तुषार बोतरे, तालुका सरचिटणीस जितेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष सचिन आव्हाड, जगदीश चव्हाण, शिवा मराठे, अ.भा.वि.प. चे सारंग पाटील, क्षुधांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *