Monday, April 29, 2024
Homeराजकीयकाँग्रेसतर्फे घोषणाबाजीने मोदी सरकारचा निषेध

काँग्रेसतर्फे घोषणाबाजीने मोदी सरकारचा निषेध

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

खायला नाही तेल, मोदी सरकार फेल, भिडविले गगनाला भाव-मोदी सरकार त्याचे नाव, तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे..! नरेंद्र मोदी किसान विरोधी, काळा कायदा मोदींचा, शेतकर्‍यांचा बर्बादीचा, मेक इन इंडिया यात तेलाशिवाय स्वयंपाक कसा करावा? अशा विविध घोषणाबाजी करीत काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

- Advertisement -

जळगाव शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे आज खा. राहुल गांधी यांचा जन्मदिवस संकल्प दिवस म्हणून काँग्रेस भवनात साजरा करण्यात आला. खा.राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या. तर मोदी सरकार विविध आघाड्यांवर फेल झाल्याने काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन केले.

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅॅड. संदीप पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी तिन्ही काळ्या कायद्यांच्या प्रतींची होळी केली.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, मुन्नावर खान, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, राजस कोतवाल, जमील शेख, मनोज सोनवणे, देवेंद्र मराठे, मुजीब पटेल, अमजद पठाण, मनोज चौधरी, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, जगपालसिंग गिर, ज्ञानेश्वर कोळी, दीपक सोनवणे, योगिता शुक्ला, अमीना तडवी, विष्णू घोडेस्वार, मालोजीराव पाटील, विजय वाणी, जाकीर बागवान, परवेज पठाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या