प्रियंका गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, केलं 'हे' आवाहन

प्रियंका गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, केलं 'हे' आवाहन
प्रियंका गांधी

दिल्ली l Delhi

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या (Modi govt) तीन कृषी कायद्यांविरोधात (farm law) शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर देशभरातील विरोधीपक्षांकडून, शेतकरी संघटनांकडून आणि आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या नागरिकांकडून दिल्लीतील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या.

दरम्यान या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका यांनी हिंसाचारच्या घटनेवरुन पंतप्रधानांना प्रश्न विचारले आहेत. लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील (Lakhimpur violence case) मुख्य आरोपी तुमच्या पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, असं आव्हान प्रियंका यांनी मोदींना दिलं आहे.

प्रियंका गांधी पंतप्रधान मोदींना तीन पानी पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी पत्रकार परिषद घेत वाचून दाखवलं. त्यांनी म्हटले की, 'गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय ७०० हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही प्रियंका यांनी म्हटले. पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली. सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेले खटले मागे घ्यावेत आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही प्रियंका गांधींनी केली.

Related Stories

No stories found.