Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या"कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच..."; प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

“कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच…”; प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

बीड | Beed

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी भाजपला (BJP) घरचा आहेर दिला आहे…

- Advertisement -

बीड शहरात प्रीतम मुंडे एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणीच गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, असे त्या म्हणाल्या.

India vs China : चिनी ड्रॅगन पुन्हा नापाक कृत्याच्या तयारीत? LAC जवळ घडतंय ‘असं’ काही…

केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेले नाही. ते व्हायला हवे होते. या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी. असे भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

“मी भाजपची पण भाजप माझी…”; पंकजा मुंडेंचे सूचक विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या