प्रधानमंत्री जी, जनता को लूटना छोड़िए; राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

केंद्र सरकार पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवण्याच्या तयारीत आहे
प्रधानमंत्री जी, जनता को लूटना छोड़िए; राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

दिल्ली | Delhi

करोनामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटक्यांमुळे केंद्र सरकार (Government of India) पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी (Petrol Diesel Excise Duty) वाढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे महागाई अधिकच वाढणार आहे. या वरून काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

"पंतप्रधानजी जनतेला लूटने सोडा, आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा, आत्मनिर्भर बना," असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

या अगोदर देखील सातत्याने राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवरून पंतप्रधान मोदीसह भाजपावर टीका केली आहे. बिहारमध्ये प्रचारा रॅलीत बोलताना त्यांनी आरोप केला होता की, मोदी सरकारला शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय यांची चिंता नाही. केवळ काही उद्योजकांसाठीच ते काम करत आहे. अंबानी आणि अदानीसाठी मोदी मार्ग सुकर करत आहेत. तर शेतकरी, कामगार व दुकानदारांना दूर करत आहेत. येणाऱ्या काळात तुमचा सर्व पैसा देशातील दोन-तीन श्रीमंतांच्या हाती जाईल, असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

पेट्रोल-डिझेलवर ३ ते ६ रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवली जाण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांकडूनच ही माहिती मिळाली. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार सरकार करोना संकटामुळे तयार झालेल्या परिस्थितीत महसूल जमा करण्याची तयारी चालवली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवून आर्थिक वर्षात ६० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवू शकतो. या वर्षाचा विचार केल्यास हा महसू ३० हजार कोटी रुपये होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांद्वारा सतत टॅक्स वाढवला जात असल्याने, क्रूड स्वस्त होण्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसून, त्यांना पेट्रोल-डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.

पेट्रोलवर लागणार टॅक्स आणि कमिशन -

एक्स फॅक्टरी किंमत - 25.32 रुपये

भाडे आणि इतर खर्च - 0.36 रुपये

एक्साइज ड्यूटी - 32.98 रुपये

डीलर कमीशन - 3.69 रुपये

VAT - 18.71 रुपये

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com