Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याUP Elections : कासगंजमध्ये ५३ वर्षांनंतर कुणी पंतप्रधान प्रचारासाठी येणार

UP Elections : कासगंजमध्ये ५३ वर्षांनंतर कुणी पंतप्रधान प्रचारासाठी येणार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुरुवारी उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) मतदानाचा (Voting) पहिला टप्पा झाला. आता राजकीय पक्षांनी आपला मोर्चा दुसऱ्या टप्प्याकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कासगंजमध्ये (kasganj) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे…

- Advertisement -

या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित राहतील अशी चर्चा आहे. सभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी कासगंजमधील पटियाली विधानसभा मतदारसंघात पोहोचणार असल्याचे समजते.

Video : लतादीदी नेहमीच राहतील स्मरणात! नाशिककर भावूक

मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीतून पंतप्रधान कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करणार आहेत. दरियावगंजजवळच्या एका मैदानात ही सभा होईल. पंतप्रधानांची करोनाकाळातील ही सर्वात मोठी सभा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तब्बल ५३ वर्षांनंतर देशाच्या पंतप्रधानपदी असणारी व्यक्ती निवडणूक प्रचारासाठी कासगंजमध्ये येणार आहे. यापूर्वी १९६९ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

त्यानंतर त्या १९७८ साली आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मतं मागण्यासाठी माजी पंतप्रधान म्हणून येथील प्रचारसभेसाठी आल्या होत्या. यासभेला पंतप्रधान मोदींबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही (Yogi Adityanath) उपस्थित असणार आहेत.

अशी आहे मुकेश अंबानींची नवी कोरी ‘रॉल्स रॉयस’ अलिशान कार

- Advertisment -

ताज्या बातम्या