करोनाचा धोका आजही सुरुवातीएवढाच - पंतप्रधान
राजकीय

करोनाचा धोका आजही सुरुवातीएवढाच - पंतप्रधान

सतर्क रहा, मास्क वापरा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi - करोना संकटकाळात अनेक प्रेरणादायी गोष्टी पुढे आल्या आहेत. मात्र अजून करोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता, देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी म्हटलं आहे. त्यांनी मन की बात Mann Ki Baat रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.

भारतीय स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) Independence Day करोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारत बनवण्याचा आणि नाविण्यपूर्ण कामे करण्याचा संकल्प करूया असेही ते म्हणाले.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत, याकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे लक्ष वेधले. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे. त्यामुळं सतर्क राहण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केले आहे. पूर्वीइतकीच खबरदारी आजही घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

चेहर्‍यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणार्‍या आजारांचा धोका वाढतो्. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं. तसेच देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.

कारगिल युद्धाची वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो, कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता.

Deshdoot
www.deshdoot.com