Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदींचा राज्यसभेतही विरोधकांवर घणाघाती हल्ला, म्हणाले...

पंतप्रधान मोदींचा राज्यसभेतही विरोधकांवर घणाघाती हल्ला, म्हणाले…

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत (RajyaSabha) राष्ट्रपतीवरील अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर दिले. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना काँग्रेसवर (Congress) नरेंद्र मोदींनी एकामागोमाग एक प्रहार केला आहे. त्यामुळे राज्यसभेत एकच गदारोळ झाला.

- Advertisement -

त्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत

पंतप्रधान मोदी बोलतांना म्हणाले की, ‘लोकशाही (Democracy) काँग्रेसच्या मेहरबानीमुळे निर्माण झालेली नाही. १९७५ मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला त्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत. १९४७ ला गर्व करून सांगायला हवं होतं की आमचा भारत ही लोकशाहीची जननी आहे. मात्र ते बोलले नाही. भारतात लोकशाही काँग्रेसने आणलेली नाही. लोकशाही आणि वादविवादाची परंपरा हजारो वर्षांपासून देशात सुरू आहे. काँग्रेसने परिवारवादापुढे कसला विचारच केला नाही.’

तसेच, ‘आज जे लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत त्यांनी जरा विचार करावा की भारतात लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा परिवादी पक्षांचा आहे. ही बाब मान्यच करावी लागेल. एवढंच नाही तर पक्षापेक्षा जेव्हा परिवार मोठा होतो तेव्हा सर्वात पहिली हत्या होते ती टॅलेंटची हे कुणीही विसरता कामा नये. देशाने एक दीर्घ काळ या परिवारवादामुळे खूप भोगलं आहे. देशातल्या सगळ्या पक्षांनी आपला सर्वांगिण विकास केला पाहिजे. भारतातला सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेस या पक्षाची जबाबदारी सर्वाधिक आहे.’ असंही मोदी म्हणाले.

VIDEO | सुप्रिया सुळेंचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर; पियुष गोयल यांचं ‘ते’ पत्रचं आणलं समोर

सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण

संघराज्याबद्दल घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना १०० वेळा लोकनियुक्त सरकारं बरखास्त करण्यात आली. मग काँग्रेसचे नेते कोणत्या तोंडानं संघराज्याची भाषा करतात, असा थेट सवाल मोदींनी उपस्थित केला.

राज्यांमधील ५० सरकारं बरखास्त करण्यात आली, लोकनियुक्त सरकार पाडण्यात आली, तेव्हा देशाचं पंतप्रधान कोण होतं, असा प्रश्न मोदींनी राज्यसभेत विचारला. सरकार अस्थिर करणं हेच त्यांचं धोरण होतं आणि आता त्याचीच शिक्षा त्यांना मिळत आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.

काँग्रेस काळात बरखास्त करण्यात आलेल्या राज्यांची यादीच मोदींनी वाचून दाखवली. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांचं सरकार बरखास्त केलं गेलं. तामिळनाडूतील करुणानिधींचं सरकार पाडलं. आंध्र प्रदेशमधलं एनटीआर सरकार बरखास्त केलं. कर्नाटकातलं बोम्मई यांचं सरकार पाडलं. विमानतळावर स्वागत व्यवस्थित झालं नाही, म्हणून त्याकाळी मुख्यमंत्री बदलले जात होते, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

करोना संकटाचं श्रेय घेण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न

गेल्या १०० वर्षात लोकांनी इतकं मोठं संकट पाहिलं नाही. संकाटाची तीव्रता मोठी होती. सर्व मानवजातीसाठी मोठं संकट होतं. आता देखील हे संकट आहे. पूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. भारताने कोरोनाला हरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची स्तुती जगात होत आहे. हे कोणत्या राजकीय पक्षाने केलं नाही. हे जनतेचं श्रेय आहे. पण, काही राजकीय नेते कोरोना संकटाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘प्रियांका चोप्रा-निक जोनास’प्रमाणेच ‘या’ सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

शरद पवारांचं कौतुक

करोना जेव्हापासून मानव जातीवर संकट निर्माण करत आहेत तेव्हापासून सरकारने या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. सार्वजनिक जीवनात उतार चढाव येत असतात. जय पराजय येत असतात. त्यातून जी व्यक्तिगत निराशा निर्माण होते ती देशावर थोपवू नये. गुजरातमध्ये एक गोष्ट आहे. पवारांना माहीत असेल, असे म्हणत त्यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि तिकडे बसलो म्हणजे देशाची चिंता करायची नाही असे असते का? कोणाकडून शिकता येत नसेल, तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करता आहे. असेही पंतप्रधान म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या