
मुंबई | Mumbai
आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांहचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे...
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येला मी समजू शकतो. भाजपाचे सरकार असो किंवा एनडीएचे सरकार असो आम्ही विकासाच्या पुढे राजकार कधीही आणत नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणत नाही.
मधील काळात डबल इंजिन सरकार नव्हते त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे नुकसान झाले. कारण त्या सरकारच्या काळात विविध योजना आणि प्रकल्प यांच्यात अडथळे निर्माण करण्याचे काम झाले. आता मात्र विकासाला पुन्हा गती आली आहे. कारण शिंदे फडणवीसांचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला मिळाले आहे आता हा विकासाला गती मिळाली आहे.
स्वराज्य आणि सुराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तोच विचार आम्हीही पुढे घेऊन चाललो आहोत. या देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास आम्ही करतो आहोत. मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी अत्यावश्यक असलेली मेट्रो असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसाचे नुतनीकरण असो, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो या सगळ्या योजना मुंबईच्या विकासात भर घालणाऱ्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.