Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादिशा सालियनवर बलात्कार कुणी केला?; राणेंनी डागली तोफ

दिशा सालियनवर बलात्कार कुणी केला?; राणेंनी डागली तोफ

मुंबई | Mumbai

सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) नेते एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत. काल नारायण राणे (Narayan Rane) यांनी मातोश्रीवरील चौघांची ईडी (ED) चौकशी होईल, असा खळबळजनक दावा केला. तसेच बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणांची फाईल पुन्हा ओपन होणार असल्याचा दावा देखील त्यांनी होता. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

ते म्हणाले की, दिशा सालियनवर (Disha Salian) बलात्कार कोणी केला? 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. पण सांगण्यात आले की तिने आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगण्यात आले. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होते. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होते. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचे होते. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील ८ जूनची पाने कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, दिशाबाबत सुशांत सिंहला समजल्यावर तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कुठे झाले?. 13 जूनला गायब झाले. त्याआधी सीसीटीव्ही होते.

सोसायटीतील लोक सांगतात. ठराविक माणसांची अॅम्ब्युलन्स कशी आली. हॉस्पिटलला त्याला कोणी नेले. याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे ही उघड होणार आहे. तेही माहिती करतील सर्व. रमेश मोरेंची हत्या कुणी केली?. जयंत जाधवची हत्या का झाली?. ही माहिती काढली तर खोलात जाईल हे आम्हाला माहीत नाही का, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता, दिला असता राजीनामा, आता उभा रहायला दोन दोन वर्षे लागतात, महाराष्ट्रात अशी वेळ कुणावर आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा धंदाच केला. शिवरायांचे नाव घ्यायचे असेल तर जनतेला अन्न वस्त्र निवारा देण्यासाठी काहीतरी करा. मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेट बैठकीला, सभागृहात जात नाही मुख्यमंत्री, असाही मुख्यमंत्री झाला याची इतिहासात नोंद होईल. गुणवत्ता पात्रता नसतानाही सव्वादोन वर्षे काढली ही बाळासाहेबांची पुण्याईच, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या